मुलाला अत्याच्या स्वाधीन करा- न्यायालय

🔷 मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश

🔺पुणे हिट अँड रन प्रकरण

मुंबई –  पुण्यातील अल्पवयीन मुलाने केलेल्या कार अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलीस करत असलेल्या कार्यावर मोठे ताशेरे  ओढले. या प्रकरणातील मुलाला जामीन मिळाल्यानंतरही कोठडीत ठेवण्याचा आदेश बेकायदेशीर आहेत, अधिकाराशिवाय तो जारी करण्यात आल्याचे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.अल्पवयीन मुलाला त्याच्या आत्याच्या स्वाधीन करण्याचे आदेशही खंडपीठाने यावेळी दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की पोलिसांच्या कारवाईला आव्हान देत आरोपी अल्पवयीन मुलाचे आत्या पूजा जैन यानी एडवोकेट स्वप्निल अंबुरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हेबीअस कॉर्पस याचिका दाखल केली होती . या याची याचिकेवर उच्च न्यायालयात गत आठवड्यात सुनावणी झाली. मात्र सुनावणी दरम्यान राखून ठेवलेला निर्णय काल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यावेळी सरकारी वकिलाने मुलाचे आई-वडील तुरुंगात असल्याने त्यांचा ताबा कोणाकडे द्यावा असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी खंडपीठाने मुलाचे आत्याच्या देखरेखी खाली ठेवण्याचे आदेश दिले