अखेर दीपा मुधोळ मुंडे यांची बदली;अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी

बीड- एम एन सी न्यूज नेटवर्क- बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर  कार्यरत असलेले अविनाश पाठक यांची नूतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ- मुंडे यांची शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी अविनाश पाठक हे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आले आहेत.

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे आता सुरू झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक तक्रारी आणि वादाचे विषय निर्माण झाल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बदली होईल अशी शक्यता होती. अखेर त्यांना बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून हटवण्यात आले आहे. दीपा मुधोळ – मुंडे या २०११ च्या आयएस बॅचचे अधिकारी होत्या.  सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आपल्या शासकीय सेवेचा प्रारंभ केला तर  बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य कारकीर्द ठरली होती. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम तसेच  सांगली,धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक सर्वत्र झाल होत

बीडच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून सुमारे वर्षभरापूर्वी आलेल्या  दीपा मुधोळ-मुंडे यांची कारकीर्द बीड मध्ये म्हणावी तेवढी प्रभावी ठरली नाही. जिल्ह्यातील जनतेच्या महिला जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात काही नवीन  बदल करतील अशी अपेक्षा दीपा मुंडे यांच्याकडून होते, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आरोपांमुळे त्यांच्या बद्दलच्या तक्रारी वाढल्या होत्या, या सर्व बाबींच्या अनुषंगाने त्यांची बदली झाली आहे.

त्यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना जिल्हाधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. अविनाश पाठक यांना बीड जिल्ह्याचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांच्याकडून बीड जिल्ह्याला खूप साऱ्या  अपेक्षा आहेत.