🔺एनपी एव्ही नेट प्रोटेक्टर🔺 सायबर सुरक्षा
मुंबई– देशात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, याविषयी माहिती देण्यासाठी व त्यांना शिक्षित करण्यासाठी ‘एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर’ या कंपनीने सायबर सुरक्षा परिषदेचे आज आयोजन केले. मुंबई परिसरातील ३०० हून अधिक आयटी व्यावसायिक, सिस्टीम इंटिग्रेटर्स, सोल्यूशन प्रदाते आणि नेटवर्क सुरक्षा तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर ही कंपनी गेल्या तीन दशकांपासून अँटीव्हायरस आणि इंटरनेट सुरक्षा उपाय यांमध्ये अग्रगण्य प्रदाता आहे.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याची दखल घेऊन, ‘एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर’ने मुंबई आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत हेल्पलाइनदेखील सुरू केली आहे. ही हेल्पलाइन ईमेल, व्हॉट्सॲप आणि फोन कॉल्सद्वारे सायबर गुन्हेगार आणि हॅकर्सपासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन देते. आपले मोबाइल डिव्हाइस व लॅपटॉप कसे सुरक्षित करायचे, संशयास्पद संदेश कसे ओळखायचे आणि सायबर गुन्हेगारीच्या नव्या युक्त्यांबद्दल अपडेट्स कसे मिळवायचे हे ज्येष्ठ नागरिक येथे शिकू शकतात. मोबाइल उपकरणे, सर्व्हर, लॅपटॉप आणि संगणक यांवर सायबर हल्ले होत असतात, ते आधुनिक पद्धतीने कसे केले जातात, याची माहिती या परिषदेमध्ये देण्यात आली.
‘एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर’ने स्वतः विकसीत केलेल्या एन्डपॉईंट सिक्युरिटी सोल्युशन्सचे यावेळी प्रदर्शन मांडण्यात आले. यांमध्ये केंद्रीकृत व्यवस्थापनासाठी ‘ईपीएस वेब कन्सोल’, कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेचे निरीक्षण करण्यासाठी ‘अॅटोमिक टाईम’, डाटा संरक्षणासाठी ‘क्रिप्टॉन एन्टरप्राईज बॅकअप’ आणि सुव्यवस्थित आयटी ऑपरेशन्स व वाढीव सुरक्षेसाठी ‘आयटी प्रो मॅनेज’ या साधनांचा समावेश होता.
‘नेट प्रोटेक्टर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक सुमीत केला म्हणाले, “एकीकडे तंत्रज्ञानात मोठी प्रगती होत आहे आणि दुसरीकडे व्यक्ती व व्यवसाय हॅकिंग, डेटा ब्रीच आणि आर्थिक फसवणूक यांना बळी पडत आहेत. एनपीएव्ही नेट प्रोटेक्टरमध्ये आम्ही जगभरातील लाखो वापरकर्त्यांचे संरक्षण करणारे सुरक्षा उपाय विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येकासाठी सुरक्षित ऑनलाइन वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”
‘एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर’च्या या सोल्युशन्सना बड्या खासगी कंपन्या, सरकारी एजन्सी, पायाभूत सुविधांची महत्त्वाची ठिकाणे आणि संरक्षण विभाग यांच्या विश्वासार्हतेचे बळ लाभले आहे. विन्डोज सर्व्हर्स, विन्डोज १०/११, मॅकबुक्स व लिनक्स यांसह सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्सचा सायबर धोक्यांपासून बचाव करण्याच्या दृष्टीने ‘एनपीएव्ही नेट प्रोटेक्टर’ने ही सोल्युशन्स डिझाइन केलेली आहेत.
छायाकार : रमाकांत मुंडे – मुंबई