उस्मान शेख एलसीबी चे पोलीस निरीक्षक

संतोष साबळे यांची नियंत्रण कक्षात बदली

बीड /एमएनसी न्यूज नेटवर्क – लोकसभेची निवडणूक संपताच जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय बदल्या होण्यास सुरुवात आली आहे.  बीड पोलिस दलातील एल सी बी चा चार्ज असलेले संतोष साबळे याची बदली झाली होऊन त्यांच्या जागी परळी संभाजी नगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांची वर्णी लागली आहे. सुमारे पाच-सहा  महिन्यांपूर्वी ते धाराशिववरून बीड जिल्ह्यातील परळी संभाजी नगर ठाण्यात आले होते.  त्यानंतर बुधवारी त्यांना जिल्हा एलसीबीचे पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.

मूळचे नांदेड येथील रहिवाशी असलेले उस्मान शेख हे २००५ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले. पहिली पोस्टींग त्यांची गडचिरोली होती. त्यानंतर त्यांनी आकलूज, सोलापूर, लातूर, परभणी, सोनपेठ, जिंतूर आदी पोलिस ठाण्यांत काम केले. सोलापूर ग्रामीणला त्यांनी एलसीबीमध्येही काम केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. वाशी आणि धाराशिव शहर येथे त्यांनी ठाणेदार म्हणून काम केले.

परळी संभाजी नगर पोलिस ठाण्यात (दि.२६) रोजी निरोप आणि पदोन्नती निमित्ताने पो.नी. संजय लोहकरे, स.पो.नि. प्रविण जाधव, स.पो. नि. राजकुमार ससाने, स.पो.नि. अनिल शिंदे, सचिन सानप, आदी शहरातील ग्रामीण,शहर आणि संभाजी नगर ठाण्यातील सहकाऱ्यांच्या वतीने शुभेच्या देण्यात आल्या.