कुंडलिक खांडे यांचे कार्यालय फोडले

🔶लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळला नाही

बीड – शिवसेना एकनाथ शिंदे गटाचेजि ल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीड मधील मुंडे  समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.  बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणेंना निवडणुकीत कुंडलिक खांडे यांनी मदत केल्याचे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा बीडमधील वातावरण तापले आहे.कथित व्हायरल क्लिपनंतर गुरुवारी  समर्थकांनी कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

जालना रोड परिसरात कुंडलिक खांडे यांचे कार्यालय आहे. ऑडिओ क्लिप मध्ये कुंडलिक खांडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलत आहेत. यानंतर मुंडे समर्थकांकडून जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.