अंबा नगरीतील ऐतिहासिक स्थळांचा होणार विकास ; १७ कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता

पर्यटकांचा ओढणार ओघ

🔷 आद्य कवी मुकुंदराज स्वामी स्मारक,खोलेश्वर मंदिर, हत्तीखाना आदी दुरुस्ती;

बीड/अंबाजोगाई- अंबाजोगाई शहरातील ऐतिहासिक अशा खोलेश्वर मंदिर, हत्तीखाना, आद्यकवी मुकुंदराज स्वामी व मूळ जोगाईच्या सभामंडपासाठी पर्यटन खात्याने १६ कोटी ७८ लाख ८६ हजार रुपये खर्च मंजूर केला होता. या मंजुरीला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या ऐतिहासिक स्मारकांच्या दुरुस्ती व जतनासाठी केजच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

मराठी भाषेचे उगमस्थान म्हणूनही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील भाषातज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अंबानगरी हे ठिकाणी मराठी भाषेची जननी म्हणून ओळखली होती. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांनी विवेकसिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केली. त्यामुळे शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अंबाजोगाई येथील राज्य संरक्षित स्मारकाची दुरवस्था झाली. यासाठी आ. नमिता मुंदडा राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी मागील काही वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा करीत होत्या. लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या संरक्षित स्मारकांच्या दुरुस्ती कामाला वेग येऊ लागला आहे.

🔺काम गुणवत्तापूर्वक व्हावे नागरिकांची अपेक्षा : ऐतिहासिक वास्तू आणि त्याची निगा देखभाल ही त्या स्थळदर्जाच्या दृष्टीने साजेशी असावी. वापरला जाणार साहित्य जसे महत्वपूर्ण असणारा दगड आणि त्याची कलाकुसर, लाकूड काम हे दर्जेदार व्हावं. पर्यटन आणि पुरातत्त्व विभाग याच्या समन्वयातून होत असलेली ही काम महत्त्वपूर्ण आहेत. दुरुस्तीसाठी असणाऱ्या या वास्तू पुरातन असला तरी श्रद्धेय असून येथे पर्यटकांचा मोठा राबता असतो.संरक्षित स्मारकाच्या कामासाठी वेगवेगळा कालावधी असला तरी साधारण वर्षभरात हे काम होणे अपेक्षित आहे

🔶 दुरुस्ती आणि स्मारकावर खर्च महत्त्व पूर्ण, ऐतिहासिक स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामांतर्गत होणारा खर्च यात
🔺खोलेश्वर मंदिरासाठी सहा कोटी पाच लाख रुपये,
🔺जोगाई सभामंडप, बडा हत्तीखाना दुरुस्तीसाठी १ कोटी ९३ लाख रुपये,.
🔺जोगाई सभामंडप (छोटा हत्तीखाना) दुरुस्तीसाठी १ कोटी ४१ लाख रुपये,
🔺अमृतेश्वर मंदिरासाठी ६ कोटी ५३ लाख रुपये
🔺आद्यकवी मुकुंदराज स्वामी स्मारकाच्या दुरुस्तीसाठी ८४ लाख ८३ हजार रुपये अस नियोजन आहे.