प्रारंभी ५२ प्रवासी, व्यावसायिकांना जलद प्रवासाचा फायदा
नांदेड-गेल्या काही दिवसापासून नागपूर-नांदेड-पुणे विमानसेवेला गुरूवारपासून (२७ जून) सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता नागपूरहून स्टार एअर कंपनीचे विमान नांदेडमध्ये उतरले, तसेच सकाळी १०.३० वाजता पुण्याकडे रवाना झाले. विमानसेवेमुळे नांदेड-पुणे हे रस्ते मार्गे ८ ते १० तास वेळ लागणारे अंतर आता विमान सेवे मुळे तसभरात गाठता येणार आहे. नांदेडकरांनी पुणे विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिला असून पहिल्या दिवशी ६० आसनी विमानात दिवशी ५२ प्रवासी पुण्याला रवाना झाले.
नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंह विमानतळावरून दिल्ली, जालंधर, अहमदाबाद, बंगळुरू, हैद्राबाद, तिरुपती, भूज अशी विमानसेवा काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. यामुळे नांदेड शहर हे विमान सेवेमुळे देशाच्या महत्वाच्या शहरांसोबत जोडले गेले आहे. त्यानंतर नांदेड-पुणे आणि नांदेड-नागपूर विमानसेवा सुरू व्हावी अशी प्रवाशांची मागणी होती. सध्या नांदेड-पुणे विमान प्रवासाचे भाडे २८०० रुपये आहे
दोन महिन्या नांदेड देशभरातील सात शहरांशी जोडले गेले असून . त्यात पुणे व नागपूर या शहरांची भर पडली आहे. यापूर्वी ३० एप्रिलला रोजी बंगळुरु-नांदेड-हिंडन आदमपूर हैदराबाद-नांदेड- अहमदाबाद- भुज या मार्गावर विमान सुरु झाले आहे.
