जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वीकारला पदभार

बीड : अविनाश पाठक यांनी आज बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला. बुधवारी दिनांक २६ जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्या बाबतचे आदेश काढले होते. त्या आदेशाप्रमाणे आज दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार अविनाश पाठक यांच्याकडे काल (दि २८) रोजी  सोपविला.

तत्पूर्वी पाठक यांनी सकाळी आपल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  पदाचा पदभार संगीतादेवी पाटील यांना सोपविला.

याप्रसंगी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, कविता जाधव, महेंद्र कुमार कांबळे यासह वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.