🔺पर्जन्यमान/हवामान
नाशिक – राज्यातील अनेक जिल्ह्यात अध्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरी झालेल्या पावसाच्या बेताने अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत पण मागील काही दिवसात पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी चिंता तूर झाला आहे. जोरदार पावसाची राज्यात प्रत्यक्ष असली तरी हवामान खात्याने राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे उपग्रहांद्वारे प्राप्त छायाचित्रावरून स्पष्ट होत आहे, ६ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी जळगावात चांगला पाऊस झाला. दिवसभरात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान खात्याने दिलेल्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज नुसार पाऊस झाला नाही. सायंकाळी किरकोळ सरींनी शहर परिसरात हजेरी लावली, छत्रपती संभाजीनगर (२.१ मिमी) व परभणी (५.१ मिमी) वगळता मराठवाड्यात उघडीपचं दिसून आली.बीड ,लातूर, उस्मानाबाद.येथे ही दमदार पाऊसाची प्रतीक्षा आहे.