परळी तालुक्यात पावसाने मारली दडी

संग्रहित छायाचित्र

🔷 पावसाची दडी, 🔺पर्जन्यमान🔺 हवामान

बीड/परळी वैजनाथ–  : या महिन्यातील सुरुवातीस काही दिवस आणि नंतर दहा ते बारा जून दरम्यान पडलेला पाऊस त्यानंतर मात्र परळी तालुक्यात गायब झाला आहे. रोज ढग दाटून येतात पण पावसाचा पत्ता नाही. जूनमध्येही तीव्र उन्हाच्या झळा त्रासदायक ठरत आहेत . आणि उष्मा सुद्धा वाढतो आहे.

परळी आणि परिसरात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे बळीराजाचेही पेरण्या खळबल्या असून पेरणी योग्य पाऊस अजून तालुक्यात झाला नाही. काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत मात्र आता मिळालेल्या उघडीप मुळे ते सुद्धा अडचणीत आले आहेत. अध्याप वातावरणातील उष्णता कमी झालेली नाही.

डोळे दीपवणारा अतिशय प्रखर होऊन तालुक्यात दिसून येत असून सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात मात्र पावसाचा पत्ता नाही तीव्र उन्हामुळे हे ज्यांच्या पेरण्या झाल्या आहेत त्यांची पिके कोमेजून जात असून बळीराजा पावसाची प्रतीक्षा करत आहे