पै. सूरज ज निकमची आत्महत्या; कुमार महाराष्ट्र केसरी किताब मानकरी

क्रिडा /कुस्ती/🔺कुमार महाराष्ट्र केसरी

🔶 कुस्ती क्षेत्रात शोककळा

सांगली-खानापूर-अल्पावधीत कुस्ती क्षेत्रात आपल्या कुशलतेणे डावपेच टाकून प्रतिस्पर्धी मल्लास चित्तपट करत दबदबा निर्माण केलेले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील कुमार महाराष्ट्र केसरी सूरज जनार्दन निकम (वय३०) याने शुक्रवारी (दि २८) दुपारी १ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पैहिलवान सुरज जनार्धन निकम हा डावपेच आखून प्रतिस्पर्धी मल्लास चितपट करन्यात तरबेज होता. यापूर्वी महाराष्ट्र कुमार केसरीसह कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकावले आहेत. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला. दरम्यान, सूरज याने शुक्रवारी रात्री घरी येऊन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या चे कारण अद्याप कळले नसून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.