🔺धार्मिक, 🔺आध्यत्मिक
सोलापूर- श्री बृहन्मठ होटगी सोलापूर, अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्था, बेंगलूरू व वीरशैव शिवाचार्य महासभा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आदी जगद्गुरू पंचांचार्य युगमानोत्सव व अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलनात संमेलनाध्यक्ष श्री ष. ब्र. डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजीच्या आशीर्वादाने व प्रेरणेने श्री सिद्धांत शिखामणी रचयिता श्री शिवयोगी शिवाचार्य भावचित्र मिरवणूक व सिद्धांत शिखामणी ग्रंथदिंडी मध्ये श्री आदी जगद्गुरू पंचांचार्य आडवी पालखी महोत्सवामध्ये वीरा संगीत विद्यालयाचे अध्यक्ष श्री विद्यासागर स्वामीच्या मार्गदर्शनाखाली विविध भजनी मंडळाने वीरशैव अभंग गाथेतील अभंग सादर केली.त्यामध्ये परळीतील वीरा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थीनी,तसेच श्री वैद्यनाथ सेवाभावी भजनी मंडळ, श्री शिवकन्या भजनी मंडळ, संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी भजनी मंडळं, श्री शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळानी ‘वंदे रेणुकमं ‘ च्या जयघोषात, शिवनामाच्या गजरात पाऊलांची सेवा दिली.
पाऊलांची सेवा देतांना सौ वंदना स्वामी,सौ शिवकन्याताई स्वामी, सौ चेतनाताई गौरशेटे, सौ. ज्योतीताई बुद्रे, सौ सविता खोत, सौ वर्षा बुद्रे,सौ. रत्नमालाताई सोरडगे, सौ सुवर्णा कस्तुरे, सौ जयश्री खोत, सौ सुनंदाबाई कोरे, सौ आशाताई कापसे, सौ भागेरथीबाई हालगे, सौ निर्मलाबाई इटके, सौ रमाताई आलदे, श्रीमती शालिनीताई वड्डे, सौ प्रभावती लव्हराळे, सौ शितल आलदे, सौ प्रभावतीबाई हत्ते, श्रीमती प्रेमलाबाई वेरूळे, श्रीमती गोदावरीबाई चौधरी,विमलबाई हरंगुळे, श्रीमती मंगलबाई गुळवे, श्रीमती शांतबाई संकाये, श्रीमती आशा हरंगुळे, सौ सरोजा सालमोटे व इतर छायाचित्रात दिसत आहे.