🔶आनंदवनात तरुणीची हत्या प्रकरण 🔶निष्काळजी भोवली दोन पोलिस निलंबित 🔶 तपास सी आय डी कडे दिला
चंद्रपूर-बाबा आमटे आनंदवन (ता. वरोरा) आश्रमात राहणाऱ्या २५ वर्षीय कर्मचाऱ्याच्या मुलीचा प्रेमप्रकरणातून खून करणाऱ्या आरोपीने रविवारी सकाळी वरोरा पोलिस ठाण्यातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. माळी समाधान (२५) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी खळभळ उडाली आहे
आरोपी समाधान उपचारासाठी आनंदवनात आला होता. येथे काम करत असताना तो प्रेमात पडला. आरोपी समाधान व तेथील मुलगी यांचे प्रेमप्रकरण होते. मात्र नंतर तिचे दुसऱ्याशी प्रेम जुळल्याच्या संशयावरून समाधानने २६ जून रोजी तिच्या घरात शिरून तिच्या मानेवर चाकूचे वार करत तिचा खून केला होता. पोलिसांनी तातडीने २७ जून रोजी आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला ४ ने जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. समाधानवर बलात्काराचाही गुन्हा दाखल होता. अटक झाल्यापासून समाधान नैराश्यात होता. रविवारी सकाळी त्याने कोठडीजवळ असलेल्या त्याच्या बुटाची लेस काढली व बाथरूममध्ये जात दरवाजाच्या खुंटीला लेसने गळफास घेतला. दरम्यान, कारागृहात काही ही सोबत ठेवता येत नाही निष्काळजीपणाचा- ठपका ठेवून दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

