🔶 जनरल द्विवेदींनी घेतली लष्करप्रमुखपदाची सूत्रे
नवी दिल्ली। जनरल उपेंद्र द्विवेदींनी ३० व्या लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्कर प्रमुख म्हणून आले आहेत . द्विवेदींना चीन तसेच पाकिस्तान सीमेजवळ कामाचा व्यापक अनुभव आहे. १९ फेब्रुवारीला उपलष्करप्रमुख बनण्याच्या आधी ते उत्तर आघाडीचे जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ होते.