दादर- गोरखपूर,नाशिकरोड-बडनेरा मेमूसह दहा गाड्यांना मुदतवाढ

प्रवास /पर्यटन 

नाशिकरोड  – रस्ते मार्गावरील प्रवासपेक्षा नगरिकाना रेल्वे प्रवास अधिक आरामदायक आणि सुखद वाटतो. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वे कडे प्रवाश्यांची गर्दी वाढते आहे. प्रवाशांची वाढणारी  गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने काही विशेष गाड्यांना जादा मुदतवाढ देण्यात आली आहे. यात नाशिकरोड- बडनेरा मेमूसह दहा रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आणि मागणीमुळे रेल्वेतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जादा मुदतवाढ झालेल्या गाड्या ज्यामध्ये गाडी  क्र. ०१०२५ दादर-बरोनी ही गाडी दि. ३० सप्टेंबरपर्यंत, परतीचे क्र. ०१०२६ बरोनी. – दादर विशेष गाडी २ ऑक्टोबरपर्यंत.

गाडी क्रमांक क्र. ०१०२७ दादर गोरखपूर ही विशेष गाडी दि. २९ सप्टेंबरपर्यंत तर परतीच्या प्रवास क्र. ०१०२८ गोरखपूर – दादर या रेल्वेगाडीला दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

क्र. ०११३९ नागपूर – मडगाव ही गाडी दि. २८ सप्टेंबरपर्यंत तर क्र.०११४० मडगाव – नागपूर ही गाडी २९ सप्टेंबरपर्यंत तसेच क्र. ०१२११ बडनेरा नाशिक रोड मेमू गाडी आणि क्र. ०१२१२ नाशिक बडनेरा मेमू गाडीस दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याशिवाय क्र. ०१०९१ खंडवा – सनावद आणि क्र. ०१०९२ सनावद- खंडवा या दोन्ही गाड्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्यांची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे. प्रवाशी नागरिकाणी प्रवासा दरम्यान स्टेशनशी संपर्क करून अधिक माहिती घ्यावी.