आर्थिक /चलनी नोटा / २००० नोट
भारतीय रिज़र्व बैंक – RESERVEBANK INDIA OF
मुंबई : वृत्तसंस्था – सुमारे एक दीड वर्षा पूर्वी व्यवहारात असलेल्या रुपये दोन हजाराच्या सुमारे ९८ % नोटा आता पर्यन्त बँकांत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिली. रुपये २००० ची नोट बंदी १९ मे २०२३ मध्ये दोन हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. दरम्यान व्यवहारात चलनात रुपये दोन हजाराच्या ३.५६ लाख मूल्याच्या नोटा चलनात होत्या. जून २०२४ महिन्या अखेर जवळपास ९७.८७ टक्के नोटा बँकांत परत आल्या आहेत.
अद्याप चलनामध्ये ७,५८१ कोटी मूल्याच्या नोटा चलनात आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील बँकांमध्ये दोन हजाराच्या नोटा जमा करण्याची आणि बदलून मिळण्यासाठी अखेरची तारीख होती. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून आरबीआयच्या शाखांमध्ये दोन हजाराच्या नोटा बदलून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. टपाल कार्यालयातून आरबीआयच्या शाखेत नोटा पाठविण्याची सुविधाही देण्यात आली आहे.