खा. बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

🔶 बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार परळी शाखेच्या वतीने विविध समाज उपयोगी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

🔺 रक्तदान श्रेष्ठ दान या युक्तीप्रमाणे रक्तदान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

बीड /परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क:-बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शाखेच्या वतीने विविध सामाजिक, लोकोपयोगी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पौळपिंप्री येथे जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप व ग्रामीण रुग्णालय सिरसाळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.

बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून राबवण्याच्या उद्देशाने पौळपिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप व ग्रामीण रुग्णालय सिरसाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  सध्यस्थितीत  रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे दवाखान्यात अनेक रुग्णांना रक्तासाठी अडचणी येत आहेत. त्या अडचणी काही प्रमाणात दूर करण्याच्या हेतूने या शिबिराचे आयोजन केलेले असून या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.