मराठा स्वयंसेवकांची बैठक; शनिवारी रॅली

हिंगोली | हिंगोली येथील मनोज जरांगे पाटील यांची ६ जुलै रोजी संवाद रॅली होणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजातील स्वयंसेवकांची पोलिस विभागाने बैठक घेतली. या वेळी अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक मारुती थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्यासह अधिकारी व सकल मराठा समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

या वेळी पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. संवाद रॅली शांततेत पार पाडण्यासाठी सकल मराठा समाजातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.