खंडवा स्टेशनवर यार्ड कामासाठी लाईन ब्लॉक; अनेक रेल्वेगाड्यांवर परिणाम

🔷 रेल्वे प्रवास /भारतीय रेल्वे /भ्रमंती 

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या अनेक विभागात अत्यावशक दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतला जातो त्यामुळे त्या दरम्यानच्या अनेक गाड्यावर मोठा परिणाम होतो. खंडवा रेल्वे स्थानकावर यार्ड रिमोडेलिंग चे कार्य पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. गाड्या उशिरा धावणे आणि मार्गातील बदल हा साधारण २२ जुलै पर्यन्त परिणाम करणारा आहे.

मिळालेल्या माहिती नुसार खंडवा स्थानकातील यार्ड च्या रिमोडलिंग कामा मुळे उशिरा धावणार आहेत. यामध्ये  काही तासांचा बदल होणार आहे. उशिरा धावणाऱ्या गाड्या यात प्रामुख्याने 🔺 हैदराबाद- जयपूर एक्स्प्रेस (१२७२०) ८ जुलैला २ तास २५ मिनिटे,  🔺जालना- छपरा विशेष (०७६५१) १० जुलैला २ तास ४५ मिनिटे, 🔺 हैदराबाद- जयपूर एक्स्प्रेस (१२७२०) १० जुलैला २ तास ३० मिनिटे, 🔺 जयपूर- हैदराबाद एक्स्प्रेस १० जुलैला १५ मिनिटे, 🔺 जयपूर – हैदराबाद एक्स्प्रेस (१२७१९) १२ जुलैला २० मिनीटे उशिरा धावणार आहे.

तसेच काही गाड्यांच्या मार्गात होणाऱ्या बदल मध्ये 🔺नांदेड- निजमुदिन एक्स्प्रेस (१२७५३) १६ जुलैला, पूर्णा-अकोला-बडनेरा-नारखेर-इटारसीमार्गे धावेल. 🔺 हिसार- हैदराबाद एक्स्प्रेस (१७०१९) १६ जुलैला रतलाम- सूरत-जळगाव मार्गे धावेल. 🔺 निजमुदिन – नांदेड एक्स्प्रेस (१२७५४) १७ जुलैला इटारसी- नारखेर-बडनेरा-अकोला-पूर्णा मार्गे धावेल. 🔺हैदराबाद-हिसार एक्स्प्रेस (१७०२०) २० जुलैला जळगाव- सूरत – रतलाम- मार्गे धावेल. 🔺 नांदेड – श्री गंगासागर एक्स्प्रेस (१२४८५) २२ जुलैला पूर्णा-अकोला-बडनेरा-नारखेर-इटारसी मार्गे धावेल. 🔺 नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस (१२७१५) २२ जुलैला पूर्णा-अकोला-बडनेरा-नारखेर-इटारसी मार्गे धावेल.

प्रवास करताना प्रवाशी नागरिकाणी वेळ, उशिरा धावणे आणि मार्गातील बदल हा लक्षात घ्यावा अधिक माहितीसाठी संबंधित स्टेशनवर चौकशी करावी.