🔶 पुरस्कार शास्त्रीय संगीत ,संगीत 🔷 सामाजिक
🔷 दरम्यान अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार; भास्करबुवा बखले पुरस्काराचे ही वितरण
पुणे – बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध गायक पं. महेश काळे यांना देण्यात येणार आहे. १ लाख ११ हजार १११ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रका द्वारे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी कळविली आहे
बालगंधर्व रंगमंदिरात १५ जुलै २०२४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून सायं. ५.०० वा. होणाऱ्या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर- न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, उद्योगपती श्रीधर प्रभू आणि नामवंत सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान याच कार्यक्रमात यंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याचे महादेव हरमलकर यांना देण्यात येणार असून रूपये १५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भास्करबुवा बखले पुरस्कार गोव्याचे शिवानंद दाभोळकर यांना, गो. ब. देवल पुरस्कार पुण्याच्या दीप्ती भोगले यांना, काकासाहेब खाडिलकर पुरस्कार पुण्याचे निनाद जाधव यांना, डॉ. सावळो केणी पुरस्कार तळेगाव दाभाडेचे केदार कुलकर्णी यांना आणि खाऊवाले पाटणकर पुरस्कार ठाण्याचे सुधीर ठाकूर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारात प्रत्येकी १० हजार रोख व स्मृतिचिन्ह असे स्वरूप आहे.