मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती

🔷 शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा 🔷मराठवाड्यातील अनेक जलाशयात 10-15 टक्केच उपयुक्त पाणी 

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क –गत वर्षाच्या तुलनेत आज तारखेवर मराठवाड्यातिल सर्वच लहान मोठ्या प्रकल्पात जुलै २०२३ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा ठिक होता. मात्र या वर्षी जुलै च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित वाढ किंवा आवक नाही . यावर्षी आज तारखेवर  केवळ १०.१९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा असल्यामुळे मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुढील काळात मोठा पाऊस न अनेक जिल्ह्यात पेरण्या खोळमतील. आणि  भविष्यात  पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी आवश्यक पाणी प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.

एकूणच अल्प पावसामुळे अनेक  जिल्ह्यात पेरणी पूर्ण झाल्या नाहीत. उपलब्ध माहिती नुसार बीड ७८.१४,लातूर ८६.७५,
संभाजीनगर जिल्ह्यात ८२.८३ टक्के, जालना७८.०५, धाराशिव ८६.४६, नांदेड ४३.८२, परभणी ६३.०७ तर हिंगोली जिल्ह्यात ६०.६८ टक्के पेरण्या आटोपल्या. दरम्यान, शेतकऱ्यांनामोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, परळी,अंबाजोगाई तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो.

पैठणच्या जायकवाडी धरणातसध्याच्या स्थितीत केवळ ४.४० टक्के जिवंत पाणीसाठा असून गत  वर्षी या धरणात २६.५१ टक्के पाणी साठा होता. मराठवाड्यातील मोठ्या शहरांसह ग्रामीणभागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. याशिवाय धरणातील पाण्याचा  शेती सिंचनासाठी वापर केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात धरणे भरणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या पावसात धरणासहमोठ्या प्रकल्पात केवळ १०.१९ टक्केच पाणीसाठा झाला आहे.   माजलगाव धरणात यावर्षी शून्य टक्के तर मागीलवर्षी १५.८० टक्के पाणीसाठा होता. येलदरी धरणात यावर्षी २७.६९ टक्के तर मागील वर्षी ४८.८१ टक्के, त्याच प्रमाणे  सिध्देश्वर धरणात मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीही शून्य टक्के पाणीसाठा आहे.

मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमधेही पाणीसाठा समाधानकारक नाही.  नांदेड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या विष्णुपुरीप्रकल्पामध्ये मागील वर्षी याच कालावधीत ३९.८७ टक्केपाणी साठा होता तर यावर्षी ३२.२९ टक्केच पाणीसाठाआहे.