नियुक्ती/निवड
पुणे । सर्व्हटस ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे नवे कुलपती म्हणून डॉ. बिबेक देबरॉय यांची नियुक्ती केली आहे. देबरॉय हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी- पीएम) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या नीती आयोगाचेही ते सदस्य होते.
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. अर्थशास्त्र आणि धोरण निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. पुरातन भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांनी विपुल प्रमाणात भाषांतर तसेच संशोधनपर लेखाचे काम केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे सर आर जी भांडारकर स्मृती पुरस्कार (२०२३) देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.