मन प्रसन्न करणारं आणि मनमोहक.. पाऊले चालती पंढरीची वाट

छायाचित्र /अध्यात्म /निसर्ग /हिरवाई

तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ – लाखो भाविकांचे आद्यदैवत पंढरीचा पांडुरंग. पांडुरंगाच्या भेटीला विदर्भातून जाणाऱ्या शेकडो पालख्या परळी वैद्यनाथ मार्गे प्रस्थान करत असतात. गजानन महाराज पालखीचा वीज केंद्र आणि शहरात असा दोन दिवसाचा मुक्काम असतो.

सुमारे लहान-मोठ्या १७५ दिंडी, पालख्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करून मार्गस्थ होतात, आपल्या पंढरपूरकडच्या प्रस्तानात सदर पालखी शहरा नजीकच्या कनेरवाडी घाटातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८- बी, यावरून जाते.

घाटातून तिचं मार्गक्रमण मन प्रसन्न करणारं आणि मनमोहक असं असतं छायाचित्र टिपल आहे मयूर आरबूने यांनी