🔺 रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद
बीड /परळी वैजनाथ- बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व शालेय साहित्याचे वाटप शनिवार 6 जुलै 2024 रोजी करण्यात आले.
बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून करण्याच्या दृष्टीने शालेय साहित्याचे वाटप व भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. पौळपिंपरी येथील शालेय साहित्य वाटप कार्यक्रमांमध्ये त्या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी कु अस्मिता पालकर या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेत 98 टक्के गुण घेतल्याबद्दल तिच्या आजोबाचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे या आयोजक तथा तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज,विधानसभा अध्यक्ष किरण काका पवार, जिल्हा उपाध्यक्ष बाबा शिंदे, तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते मुक्तारामजी गवळी, भटके विमुक्त जमाती तालुका अध्यक्ष गणेश देवकते, तालुका सरचिटणीस रामचंद्र देवकाते, विद्यार्थ्या आघाडी तालुका अध्यक्ष अक्षय भैय्या सोनवणे ,राष्ट्रवादी युती तालुकाध्यक्षा दिपालीताई सावंत , संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरड, सामाजिक कार्यकर्ते रुस्तुमजी माने, नितीन भैया कदम, अजय भैय्या घोडके, दत्ताभाऊ घोडके, ज्येष्ठ नेते शिवाजीराव लोमटे, बाळासाहेब कदम, केशवराव घोडके, जावेद भाई ,गौरव नवले, प्रवीण सोनवणे, संतोष आचार्य यांसह कार्यकर्ते पदाधिकारी रक्तदाते शिक्षक जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.