अर्थमंत्री 23 जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 

🔷 केंद्रीय अर्थसंकल्प- बजेट 

नवी दिल्ली- 22 जुलैपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून 12 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  23 जुलैला लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.   संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूज यांनी ही माहिती दिली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरम्यान संसदेत अर्थसंकल्प सादर करन्याची शक्यता  आहे.

एकूणच तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदींच्या कार्यकाळातील हा अर्थसंकल्प असून अनेकांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.  हा अर्थसंकल्प 22 जुलै रोजी सादर केला जाऊ शकतो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  सादर करत असलेल्या हा सातवा अर्थसंकल्प असून सलग सात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशातील त्या पहिल्या अर्थमंत्री असणार आहेत.  मोरारजी देसाई यांनी यापूर्वी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत.