🔺गुणवंत/यशस्वी
बीड/परळी-वैजनाथ :- बालाघाट मनसे संपर्क कार्यालय येथे इयत्ता आठवीच्या NMMS, MTSE आणि स्कॉलरशिप परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चिरंजीव गौरव हरंगुळे व चिरंजीव सर्वेश हरंगुळे या विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकाचे कौतुक करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड,प्रवीण सरवदे यांनी या विद्यार्थ्यांना भविष्यातील UPSC व MPSC या परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले तर मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी धैर्य ,आत्मविश्वास, सातत्य हे महत्त्व सांगितले व भावी कारकीर्द साठी शुभेच्छा दिल्या तसेच मनसेचे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाज उपयोगी भूमिका घ्यावी असे आव्हान करून शुभेच्छा दिल्या यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे, गोविंद लोखंडे , नरहरी लोखंडे उपस्थित होते…