
(रेल्वे लाईन नजीकचे आझाद नगर भागातील प्रातिनिधिक छायाचित्र )
रेल्वे दुहेरीकरण
🔷 परळीत भूमी अधिग्रहण करण्याची अधिसूचना जारी 🔷 रहिवाशी इलाका वगळवा नागरिकांची मागणी
बीड /परळी वैजनाथ /– केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या परभणी-परळी दुहेरीकरण रेल्वे मार्ग कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असून या दुहेरीकरण मार्गासाठी जमीन आधिग्रहन करण्याची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने काढली आहे. या दुहेरीकरण मार्गासाठी एकूण 770 करोड रुपये निधी मंजूर झाला असून परळीकडून गंगाखेड मार्गावरील जमीन अधिग्रहण करण्यात यावी याची अधिसूचना काढण्यात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागातील विविध मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत.परभणी जंक्शन येथून पूर्णा, जालना सोबतच परळीकडे जाणारा मार्ग आहे. परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे एकूण अंतर 64.71 किलोमीटर एवढे आहे. परभणी-परळी या मार्गावर दररोज 15 ते 20 रेल्वे गाड्या धावतात. या सोबतच परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी लागणाऱ्या कच्च्या कोळशाची मालगाडीद्वारे वाहतूक करण्यात येते.या मार्गावरील रेल्वेगाड्याची वर्दळ जास्त असल्याने अनेक वेळा परळी स्थानकापासून जवळच असलेल्या वडगाव निळा या ठिकाणी क्रॉसिंगमुळे तासनतास उभ्या असतात यामुळे या मार्गावर दुहेरीकरण करण्याची मागणी प्रवाशीवर्गातून वारंवार करण्यात आली होती.याकडे रेल्वे विभागाकडून या मार्गावर दुहेरीकरणं करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आला होता.सन 2010-11 मधील अर्थ संकल्पात यास मंजुरी मिळाली असून याकामी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबत रेल्वे मंत्रालयाने दि 18 जून 2024 रोजी काढलेल्या राजपत्रानुसार परळी रेल्वे स्थानक भागातून गंगाखेडच्या दिशेने असलेल्या आझाद नगर,सिमेंट कारखाना, बरकत नगर, मिलिंद नगर आदी भागातील अनेक जमिनी अधिग्रहण करण्यात येणार आहेत.
परभणी-परळी रेल्वे मार्गाचा समावेश दुहेरीकरण कामासाठी केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात कामासाठी निधी मिळाला नसल्याने हे काम अपूर्णच राहिले. सदरील काम पूर्ण करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी 770 कोटी रुपये मंजूर झाल्याने या मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून 18 जून 2024 रोजी भूमी अधिग्रहण करण्याची अधिसूचना काढली आहे.या मार्गावरील जमिनीचे अधिग्रहण होऊन प्रत्यक्षात लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
==============
🔺 मोजमाप फीस विचारना पत्र भूसंपादन विभागाला प्राप्त
दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून परळी उप विभागीय कार्यालय येथे अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी आकारण्यात येणारी फीस काय असणार आहे याची माहिती भु संपादन विभागाला विचारणा करणारे पत्र मिळले असून लवकरच मोजमाप करण्याचे फीस भरून प्रत्यक्ष मोजमाप सुरू होणार आहे.
परळी शहर व शहरालगत असलेल्या या सर्वे नंबर मधील जमिनी होणार अधिग्रहण
83, 83/2, 96, 96/1, 98, 98/1, 100/1, 100/1/2, 100/1/3, 100/2/1, 100/2/2, 100/2/3, 101, 101/2/2, 104/1, 104/2, 105, 106/1/1, 106/1/2, 106/2/1, 106/2/2, 107/1, 107/2, 109/1, 109/2, 144/1/1, 144/1/2, 144/1/3, 144/1/4, 144/1/5, 144/2/1, 144/2/2, 145, 145/1/1, 145/1/2, 145/1/3, 145/2/1, 145/2/2, 153/1/1, 153/1/2, 153/1/3, 153/1/4, 154/2/1, 153/2/2, 46, 46/2, 50/1, 50/1/2, 50/1/3, 50/1/5, 50/1/7, 50/2, 50/2/1, 50/2/2, 50/2/3, 50/4, 50/6, 75/1, 75/1/10, 75/1/11, 75/1/12, 75/1/13, 75/1/15, 75/1/15, 75/1/16, 75/1/17, 75/1/18, 75/1/19, 75/1/20, 75/1/21, 75/1/22, 75/1/23, 75/1/5, 75/1/3, 75/1/4, 75/1/6, 75/1/7, 49/1, 49/2, 75/1/8, 75/1/9, 75/2/1, 75/2/3, 75/2/4, 75/2/5, 75/3/1, 75/3/2, 76/3/3, 75/4/1, 75/4/10, 75/4/2, 75/4/3, 75/4/4, 75/4/5, 75/4/6, 75/4/7, 75/4/8, 77, 78/1, 78/2, 78/3, 79/1, 79/2, 78/3, 80/1 या सर्वे नंबर / गट नंबर मधील सुमारे 2.07 हेक्टर जमीन मोजमाप करून रेल्वे विभाग अधिग्रहण करणार आहे.
मात्र यातील बराचसा भाग हा नागरी वस्तीचा आहे. उपरोक्त सर्वे नंबर यात वैजवडी शिवार चा काही मोकळा जमिनीचा भाग सोडला तर आझाद नगर,बरकत नगर, मिलिंद नगर,य भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची पक्की घरे आहेत. याचा रेल्वे विभागाने विचार करावा अशी नागरिकांची मागणी पुढे येत आहे.

