
◾अप्पर सचिव नितीन गद्रे यांचे नव्या नियुक्तीचे आदेश.
बीड-एम एन सी न्यूज नेटवर्क- जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून आलेल्या दीपा मुधोळ मुंडे यांची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच बदलीचे आदेश निघाले होते. मात्र त्यांना कुठलाच पदभार देण्यात आलेल्या नव्हता. आज अप्पर सचिव नितीन गद्रे यांनी त्यांची नियुक्ती पुणे महानगर परिवहन महामंडळ च्या अध्यक्षा व व्यवस्थापकी संचालक या पदावर केली आहे.
बीड जिल्ह्याच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्ह्यात आलेल्या दीपा मुधोळ मुंडे यांची लोकसभा 2024 च्या निकालानंतर अवघ्या काही दिवसात बदली करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान घडलेल्या अनेक बाबी पुढे आल्या होत्या. त्यादरम्यान घडलेल्या अनेक घटनांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यात बोगस मतदान असेल किंवा निकालानंतर सर्वात उशिरा जाहीर केलेला निकाल असेल.
आज नितीन गद्रे अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
त्यांच्या पत्रात शासनाने आपली नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ म. पुणे या पदावर (श्री. आशिष येरेकर, भाप्रसे यांचे दि. १ जुलै २०२४ चे बदली आदेश रद्द करून) श्री एस. जी. कोलते भाप्रसे यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय सेवेत अवनत करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. कोलते, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. असे आदेश काढले आहेत.

