🔴 रेल्वे दुहेरीकरणासाठी एकाही नागरिकांचे घर बाधित होऊ देणार नाही; – धनंजय मुंडे यांचा परळीकरांना दिलासा
🔴 धनंजय मुंडेंचा बाधा पोचणाऱ्या नागरिकांशी व्हीडिओ कॉलवरून संवाद
🔴 वाल्मिक अण्णा कराड, ऍड.राजेश्वर चव्हाण यांच्या सोबतीने हजारो परळीकर नागरिकांनी दिले निवेदन
बीड/परळी वैद्यनाथ (दि.08) – परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे पटरी चे दुहेरीकरण करणे प्रस्तावित असून यासाठी दिनांक 19 जून रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे पटरी चे दुहेरीकरण करणे प्रस्तावित असून यासाठी दिनांक 19 जून रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात परळी शहरातील लोकवस्ती असलेल्या अनेक भागातील घरे प्रभावित होणार असल्याचे दिसत असल्यामुळे आज परळीकरांच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या नेतृत्वात आज परळीकरांच्या वतीने सदर राजपत्र रद्द करण्यात यावे, असे निवेदन उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांना देण्यात आले आहे.
विकासाला कोणाचाही विरोध नाही, मात्र परळी गावाच्या दक्षिण बाजूने सदर भुसंपादन प्रस्तावित केले आहे, मात्र हे राजपत्र रद्द करून त्याऐवजी उत्तर दिशे कडून भुसंपादन करावे, जेणेकरून कुणाचेही घर बाधित होणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्हीडिओ कॉल वरून उपस्थितांशी संवाद साधत कोणत्याही परिस्थितीत एकही व्यक्तीचे घर बाधित होणार नाही, याबाबत परिपूर्ण नियोजन करण्यात येईल, प्रसंगी यासाठी आपण रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करून मार्ग काढू, त्यामुळे कोणीही काळजी करू नये, असे धनंजय मुंडे म्हणाले.
राज्यात व केंद्रात महायुतीचे सरकार असल्याने काही विरोधकांकडून या बाबीचे राजकारण केले जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एकही व्यक्तीचे घर पडणार नाही, कुणाच्याही मर्जी शिवाय कुणाचीही जागा ना.धनंजय मुंडे हे बाधित होऊ देणार नाहीत, असा विश्वास ऍड.राजेश्वर चव्हाण यांनी उपस्थितांना दिला.
कोणाचेही घर पडणार नाही, त्यासाठी मी स्वतः व धनंजय मुंडे साहेब प्राणांतिक प्रयत्न करतील, कुणीही बेघर होणार नाही, काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असे यावेळी वाल्मिक अण्णा कराड यांनी म्हटले आहे.
आजचे निवेदन देण्याच्या निमित्ताने वाल्मिक अण्णा कराड, ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शकील भाई कुरेशी यांच्या सोबतीने हजारो परळीकर आज परळीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मध्ये दाखल झाले होते. दरम्यान सदर राजपत्र रद्द करण्याबाबत वरिष्ठ वकिलामार्फत निर्धारित मुदतीच्या आत हरकत याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही वाल्मिक अण्णा कराड यांनी म्हटले आहे. यावेळी ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शकील भाई कुरेशी, अय्युब भाई पठाण, अनंत इंगळे, रवी मुळे, अल्ताफ पठाण, जावेद कुरेशी, इस्माईल पटेल, अजीज कच्छी, शामसुंदर दासूद, केशव गायकवाड, महेंद्र रोडे, विजय भोयटे, शंकर आडेपवार यांसह असंख्य परळीकर उपस्थित होते.
