भुयारी मेट्रो ऑगस्टमध्ये सुरू होणार

🔺 सार्वजनिक नागरी परिवहन

🔶 अंतर ३.६ किमी 🔶 कोथरूड ते चांदणी चौक आणि रामवाडी तें वाघोली यादरम्यान मेट्रो चा विस्तार होणार.

पुणे– शहर आणि परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि  मोठया प्रमाणात उपलब्द असणं आवश्यक आहे. कोथरूड ते चांदणी चौक आणि रामवाडी तें वाघोली यादरम्यान मेट्रो विस्तारही होणार आहे. त्या मार्गात हिंजवडी ते चांदणी चौकसाठी सर्वेक्षण गरजेचे आहे. दरम्यान  पुणे मेट्रोचा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा ३.६ किलोमीटर मार्गाचा भुयारी मार्ग ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक जलद आणि सक्षम असण्याची गरज असून या करिता सुमारे ३७०० बसची गरज आहे. सद्यस्थितीत प्रदूषण विरहित वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याची मोठी गरज आहे. या साठी १७७ इलेक्ट्रिक बस, ४०० सीएनजी बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उपलब्ध असलेल्या डिझेल बस प्राधान्याने सीएनजीमध्ये बदलण्यात येत आहेत.