पुणे विमानतळ नवे टर्मिनल येत्या रविवारपासून सेवेत दाखल

इनलँड बॅगेज सिस्टिम सुविधा 

पुणे – गेल्या अनेक महिन्यापासून तयार असूनही वापरा साठी रखडलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल   रविवार १४ जुलै पासून सुरू होत आहे. सीआयएसएफच्या जवानांच्या नियुक्तीसाठी हे टर्मिनल खोळंबले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सीआयएसएफचे जवान नियुक्तीसाठी पाठपुरावा केला होता. नव्या टर्मिनलमध्ये इनलँड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

नवीन टर्मिनल च्या सुरक्षा व्यवस्थापन आणि त्या अनुषंगाने इतर कार्यासाठी सी आय एस एफ च्या अतिरिक्त जवाणाची गरज होती. त्यासाठी परवानगी मिळाली असून टर्मिनल सेवेत दाखल होत आहे अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमाना  दिली.