PC -india.com
🔺 अनेक एक्स्प्रेस विलंबाने, प्रवाश्यांचे हाल 🔺 लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडले 🔺रेल्वे मार्गावर पाणी भरले 🔺 शाळांना आजही सुटी,🔺 विमान सेवा प्रभावित
मुंबई – सोमवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेतील प्रवासी गाड्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. आज मंगळवारी सुद्धा अनेक गाड्याना विलंब होण्याची शक्यता आहे. भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणाऱ्या (अप मार्ग) पाच रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. तर भुसावळकडे येणाऱ्या ११ गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावणार आहेत. सोमवारी दिवसभर प्रवाशांची गैरसोय झाली.
मुंबईतील पावसाचा रेल्वे दळणवळणाला फटका बसला. मनमाड ते सीएसटीएम पंचवटी एक्स्प्रेस, धुळे – मुंबई एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरी येथे थांबवण्यात आल्या. तर मुंबई हिंगोली जनशताब्दी आणि मुंबई – धुळे एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरी रेल्वे स्थानकावरून सुटणार आहेत. यामुळे कल्याण, ठाणे, दादर व मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.
एक्सप्रेस आणि लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिरा धावत असून काही महत्वाच्या गाड्या 🔺एलटीटी – बनारस एक्स्प्रेस १४ तास लेट. मुंबईतील सीएसएमटी व व एलटीटी स्थानकातून सुटून भुसावळकडे धावनाऱ्या ११ गाड्या विलंबाने सुटणार आहेत. 🔺एलटीटी- गोरखपूर ८ तास, 🔺एलटीटी – गोरखपूर काशी एक्स्प्रेस ५ तास, 🔺एलटीटी – हरिद्वार ५ तास, 🔺🔺एलटीटी- बरेली एक्सप्रेस ७ तास, 🔺मुंबई – फिरोजपूर एक्स्प्रेस ४ तास, 🔺एलटीटी- अयोध्या ४ तास, 🔺एलटीटी – बलिया ६ तास, 🔺एलटीटी- पाटणा दीड तास, 🔺एलटीटी- सीतापूर ४ तास, 🔺एलटीटी – गोरखपूर गोदान एक्स्प्रेस ८ तास लेट