राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा कडुन परळी विधानसभे करिता  सौ.सुदामतीताई गुट्टेंचे नाव आघाडीवर

🔶 परळी विधानसभेला येणार रंगत
परळी वैजनाथ /-  पक्षाने लोकसभा तर जिंकली आहे आता विधानसभा जिंकण्यासाठी परळी विधानसभा मतदारसंघात मोर्चा बांधणीला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबा बरोबर एकनिष्ठ म्हणुन परिचित  असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील माजी राज्य उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी ओळखल्या जाणाऱ्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांची परळी विधान सभेच्या उमेदवारीसाठी नाव आघाडीवर असल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहेत.
अगदी सुरवाती पासुनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या एकनिष्ठ कार्यकर्ता राहिल्या आहेत.शरदचंद्रजी पवार साहेबांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येयधोरण तळागाळातील शेतकरी शेतमजूर व वंचित, पिडीता पर्यंत पोहचविण्याचे कार्य सातत्याने सौ.गुट्टे यांच्याकडून राबविण्यात येते
या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असताना त्यांच्या उसाचा प्रश्न अथवा पिकविमा,
दुष्काळी अनुदान मिळवण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरुन प्रश्नांची सोडवणूक करुन घेतात .याच बरोबर गेली काही वर्षापासून या भागातील साखर कारखाने कधी बंद तर कधी चालू अश्या परिस्थितीत होते.अश्या प्रसंगी उस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते.या शेतकऱ्यांच्या मदतीला कोणताही कारखाना किंवा नेता मदतीला आला नाही शेतकऱ्यांचा उस कारखान्याला गेला पाहिजे म्हणून स्वतः गाड्या,उस तोडणीचे कोयते देऊन या भागातील उस साखर कारखाण्याला पाठवुन शेतकऱ्यांच्या या संकटसमयी त्या धावून गेल्या.

मतदार संघात दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक अडचणीच्या वेळेस निस्वार्थी सेवेतून केलेली तप्पर असल्यामुळे गावोगावी त्यांचा मोठा संपर्क आहे . वंचित घटक, शेतकरी,महिला भगिनी, युवा वर्गात त्यांची सहानुभूती आहे. आणि हाच त्यांचा चाहता वर्ग असल्यामुळे येणाऱ्या विधान सभा निवडणूकीत त्यांना संधी मिळावी अशी अनेकांचे अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत पक्षाशी एकनिष्ठ राहुन परळी विधान सभा मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे बप्पाचा प्रचार केला.पक्षाच्या पटलावर असून सौ.सुदामतीताई गुट्टे यांचे नाव आघाडीवर

दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या नावाची चाचपणी करण्यात आल्याचे पक्षाच्या कार्यकर्तांकडुन कळते आहे.