क्राइम /खून /गुन्हेगारी
हिंगोली/कळमनुरी –तालुक्यातील धानोरा जहांगीर येथील एकाचा शेनोडी शिवारात गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना, सोमवारी (८ जुलै) दुपारी उघडकीस आली. कळमनुरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
धानोरा जहांगीर येथील सदानंद महादू डोंगरे (५५) हे रविवारी रात्री साडेआठ वाजता घराबाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र एक नातेवाइकांकडेही त्यांची माहिती मिळाली नाही. दरम्यान सोमवारी दुपारी बारा वाजता शेनोडी शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाली होती. पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.