मिहीर शहा ला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी; वरळी हिट अँड रन प्रकरण

अपघात /
◾वाहन चालवताना काळजी महत्वाची. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर अनेक प्रकरणं घडली,

मुंबई – वरळी हिट रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला आज मिहीरला न्यायालयात हजर करण्यात आले होते.  मुंबई पोलिसांनी काल बेड्या ठोकल्या. त्यानंततर गुन्हा दाखल करून रात्री उशीरा त्याच्या कुटुंबियांना देखील चौकशीसाठी नेले. या प्रकरणात मिहीरच्या परिवारातील सदस्य आणि कही मित्र यांचे जबाब घेण्यात आले.

वरळीतील अपघातावेळी आपणच गाडी चालवत असल्याची कबुली मिहीर शहाने मुंबई पोलिसांना दिली आहे. दरम्यान, आज मिहीरला न्यायालयात हजर करण्यात आले, यावेळी पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडडी मागणी केली . कोर्टाने त्यास १६  जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अपघात झाल्यानंतर आपणास मारहाण  होईल य भीतीने आम्ही  घाबरून गेल्याच  मिहीरच्या बहिणीने आम्ही घर सोडल, मिहीर आणि त्याचं कुटुंब दोन गाड्यांनी शहापूरला गेल्याची माहिती पोलिसानी दिली.  पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने आपणच ड्रायव्हिंग सीटवर बसल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर तो खूप घाबरला आणि त्यांचे वडील राजेश शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तो तेथून निघून गेल्याचं आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.