विरार, मुंबई येथे महाकाली मंदिराचे भव्य उद्घाटन

🔶 वडिलांच्या  स्मरणार्थ मुलीने केली महाकाली मंदिराची उभारणी.

मुंबई – प्रतिनिधी -आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मुलीने विरार येथे महाकाली मंदिराची उभारणी केली असून सुंदर असे मंदिर तयार झाले आहे. याचे  उद्घाटन ११ जुलै २०२४ रोजी विरार येथे होणार आहे.

प्रियंका के. पॉलने हिने तिचे दिवंगत वडील केके पॉल यांच्या स्मरणार्थ हे महाकाली मंदिर बांधले आहे. ११ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत कालीमूर्ती प्रतिष्ठापनेचा मुख्य कार्यक्रम होईल, त्यानंतर १२ जुलै रोजी शिवलिंग स्थापनेसह रुद्र अभिषेक होईल. १३ जुलै रोजी माता की चौकी होणार आहे. सदर मंदिर हे कणेर फाटा, मोडल पाडा, ग्रीन पर्ल इस्टेट, प्लॉट ९१, विरार पूर्व येथे आहे.

मुंबई प्रतिनिधी : रमाकांत मुंडे