🔺निवड/निवडणूक 🔷 धारूर वकील संघ
बीड-धारुर : वकील संघ धारूर ची वार्षिक पदाधिकारी निवडणूक नुकतीच संपन्न झाली. वकील संघाच्या नूतन अध्यक्षपदी ॲड एम.एस. अंहकारे यांची तर सचिवपदी ॲड. आर. व्ही अवस्थी यांची निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वकील संघाची निवडणूक पार पडली. निवड झालेल्यांमध्ये अध्यक्ष ॲड. एम.एस. अहंकारे, उपाध्यक्ष ॲड. प्रशांत ठोंबरे, सचिव ॲड आर.व्ही. अवस्थी, कोषाध्यक्ष म्हणून रवी. एस. सावंत तर ग्रंथपाल म्हणून अॅड. बळवंत नखाते यांची निवड झाली.
निवडणूक अधिकारी म्हणून ॲड कुंदनकुमार शुक्ला यांनी काम पाहिले. निवड प्रक्रियेनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व वकील सदस्य उपस्थित होते.