छबीन्यातील भक्तांच्या वतीने तहसीलदारांचा सत्कार

भजनी मंडळ/ धार्मिक उपक्रम 

परळी वैजनाथ – श्री वैद्यनाथ मंदिरात दर सोमवारी पारंपरिक पद्धतीने छबीना भजन कार्यक्रम होत असतो. मंदिरप्रशासन  अध्यक्ष यांच्या कडून या छबीन्यातील भजन सदरकरणाऱ्या भक्ताना नियमित अत्यावश्यक सोई उपलब्ध करून दिल्या जातात.  नुकताच श्री वैद्यनाथ देवस्थान चे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे याच्या  वाढदिवसानिमित्त छबीण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला .

छबीन्यातील सर्वं  सदस्य यांच्या वतीने  शुभेच्छा देऊन शाल, पुष्पहार, श्रीफळ तसेच प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करतांना नायब तहसीलदार श्री बाबुराव रुपनर सर, परळीतील व्यापारी श्री सुभाष शेटे, तेजस विर्धे, विजय खोत, संजय कोरे,मृदंगवादक  गुरुसिध्द सौंदळे, योगेश रायबोळे, रोहित वाघमारे, प्रथमेश साखरे, सौ बबिता स्वामी, सौ चेतना गौरशेटे,श्रीमती निर्मलाबाई पुस्कर, श्रीमती सुलोचना हत्ते, श्रीमती शकुंतलाबाई बुरकुले,श्रीमती गोदावरीबाई चौधरी, सौ ललिता वेरूळे, सौ राधा कोद्रे, श्रीमती शोभा कुलथे, सौ प्रणिता महाजन, सौ शिवकन्या स्वामी,सौ ललिता सौंदळे,सौ वनिता चौधरी, श्रीमती रजनीबाई खोत आणि इतर छबीन्यातील सर्वं सदस्य उपस्थित होते.