नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई येथील महत्त्व पूर्ण असलेल्या उपनगरीय वाहतूक सुविधेसाठी पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी तिसरा टप्पा गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्य बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येत असून, गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे मुख्य कार्यक्रम होत असून पंतप्रधान मोदी मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. दरम्यान यावेळी विविध प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करतील. इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या एका टॉवरचे उद्घाटनही त्याांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित राहतील.