बाबासाहेबांचे इंदू मिलमधील स्मारक पुढील वर्षापर्यंत पूर्ण करणार

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक संकल्प चित्र

🔷देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत माहिती दिली  

मुंबई : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

भाजपचे आमदार भाई गिरकर यांच्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना फडणवीस म्हणाले, स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. स्मारकाचे बांधकाम लवकरच पूर्ण केले जाईल. तेथे उभारण्यात येणाऱ्या भव्य पुतळ्याचे मॉडेल मंजूर करण्यात आले आहे.

वास्तवात २०२१ मध्येच स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प होता. बाबासहेबांचा येथील पुतळा उभारण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.पुढील वर्षापर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करू, असा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने सरकारने वारंवार बैठकाही घेतल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.