मुंबई-परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क आज मतमोजणी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांच्यासह पाचही जागेवर विजय मिळवला आहे, महायुतीला ऐकून नऊ जागावर विजय मिळाला तर महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या विजयी झाल्या. निकाल हाती येताच परळीत पंकजा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी एकच जल्लोष आणि गुलालाची उधळण, मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी ही चौकाचौकात झाली करण्यात आली.
लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन व्हावे या मागणीने जोर धरला होता. पंकजा मुंडे या राज्यातील ओबीसी मतदारांसाठीचा एक आश्वासक असा चेहरा असून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे लोकनेते होते. त्याचप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनाही मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्र राज्यात आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा अल्पशा मताने पराभव केला होता.
२०१९ च्या विधान सभेची निवडणूक पराभूत झाल्यानंतर त्यांना राजकीय संधी देण्यातअनेकदा डावलण्यात आल्याची भावना त्याच्या समर्थकात होती. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यात आणि समाजातील युवकात नवचैतन्य निर्माण झाले होते आणि आज झालेल्या निवडणूक निकाल नंतर ताई विजयी झाल्याचा जल्लोष शहरभर आणि तालुक्यात होताना दिसून येत आहे.सुमारे पाच वर्षानंतर त्या सक्रिय राजकारणात विधानपरिषद द्वारे परतल्या आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे या विजय झाल्याचे घोषित होताच अरे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आतीशबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे यांचे निवासस्थान असलेल्या यशश्री बंगल्यावर गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष करण्यात आला. शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक, शिवाजी चौक, आदि ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील विविध भागात सुमारे दोन ते तीन तास लगातार फटाक्यांचे आवाज घुमत होते. जागोजागी गुलालाचा सडा आणि उत्साही कार्यकर्त्यांचे जथे राणी लक्ष्मीबाई टावर चौक आणि पंकजा मुंडे यांच्या यशस्वी बंगल्याच्या परिसरात दिसून येत होते.