कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली, अर्धा दिवस अडकले प्रवासी;

कोकण रेल्वेने केली राज्य परिवहन बसची व्यवस्था

मुंबई/पुणे- गत सुमारें 24 तासापेक्षा अधिक काळ राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात पाऊस सतत कमी अधिक स्वरूपात स्थिरावला आहे. केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील काही शाळाना सुटी देण्यात आली. तर लोकल वाहतूक व्यवस्था सुरळीत होत आहे.

थोडक्यात महत्वाचे
◾गोवा आणि कर्नाटक केरळमध्ये सोमवारी शाळा बंद होत्या.
🔺नाशिक- रविवारी अंजनेरी डोंगरावर अनेक पर्यटक अडकले. सुमारे चार पाच तासांच्या परिश्रमानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका झाली
🔺कोकणात रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रविवारी सायंकाळी सेवा बंद झाली होती.दरम्यान या मार्गावरील धावत असलेल्या आणि खोळंबून राहिलेल्या गाड्यामध्ये 15 तासांपेक्षा अधिक काळ गाड्यांमध्ये अडकन पडले होते. राज्य परिवहन चा बस च्या मदतीने कोकण रेल्वेने सोमवारी सर्व प्रवाशांसाठी नियोजित स्थळी जाण्याची सोय केली.              🔺 हवामान खात्याने महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
🔺सततच्या पावसामुळे लोणावळा आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
🔺 पाणीपातळीत वाढ होत आहे