🔺संस्कार वारकरी संप्रदयाचे 🔺 भक्तिरस 🔺निरागस भक्ति
बीड /परळी वैजनाथ एम एनसी न्यूज नेटवर्क -दि. १६ जुलै आषाढी एकादशी च्या निमित्ताने शहरातील विद्यावर्धिनी विद्यालयात मोठया उत्साहात बाल दिंडी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी होते त्यांच्याहस्ते विठठलाची पुजा करण्यात आली.
यावेळी चिमुकले विद्यार्थी विविध वेशभुषेत सहभागी झाले होते. अवघे वातावरण विठठलमय झाले होते. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात व चिमुकल्या वारक-यांनी पाउले खेळली. पंढरपुरला जाण-या दिंडी ‘प्रमाणे संपुर्ण दृष्ये दिसत होते. छोटया वारक-यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींच्या खादयांवर भगव्या पताका शोभत होत्या.
या कार्यक्रमासाठी श्री. धनंजय आरबुने(दैनिक पुण्यनगरी), नितीन ढाकणे, अतुल्य महाराष्ट्र, अमोल सूर्यवंशी विविध माध्यमांच्या प्रतिनिधीनी उपस्थिती लावली. कार्यक्रमात श्री सचिन स्वामी शाळेचे पालक यांनी मुलांना खाऊ वाटप केला.
दरम्यान सकाळपासून रिमझिम पाऊस चालूच होता अतिशय आल्हाददायक आणि प्रसन्न अस वातावरणात हा बाल दिंडी सोहळ्याने सर्वाना भक्ति रसात चिंब केले उपस्थित सर्वानी टाळ्याच्या गजरात बाल गोपाळांच्या वारकऱ्यांच्या पारंपरिक वेषभूशेचे आणि त्यांच्या भक्तीचे कोतूक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. कोळगे साहेब, उपाध्यक्ष श्री. भिंगोरे साहेब, सचिव श्री. ईटके साहेब, संचालक श्री. एम.टी.मुंडे साहेब श्री. पैंजणे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक श्री. निला, श्री. सुमठाणे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री हंगरगे सर, चिक्षे सर, विजय मुंडे सर , खेत्रे सर, पी बी यादव सर ,बोतकुलवार सर, राजू मुंडे सर व तसेच शिक्षिका जोशी मॅडम, पैंजण मॅडम गायकवाड मॅडम यांनी परिश्रम घेतले