परळी वैजनाथ येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

 तीर्थस्थान- गुरुपौर्णिमा- धार्मिक –

बीड /परळी वैजनाथ – दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक परमपूज्य श्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी हालगे गार्डन परळी वैजनाथ येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी परळी वैजनाथ येथे जागृती संस्थांचे संस्थापक श्री गुरु आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हालगे गार्डन येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान च्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता आरती होणार असून 10 वाजता सत्संग, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.