माहेश्वरी महिला मंडळ व आर्य वैश्य महिला मंडळ यांची दिंडी

आषाढी एकादशी महिला दिंडी 

परळी वैजनाथ  :आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी सायंकाळी श्री हनुमान मंदिर, मोंढा ते संत जगमीत्र नागा मंदिर दरम्यान माहेश्वरी महिला मंडळ व आर्य वैश्य महिला मंडळ परळी यांच्या वतीने दिंडी काढण्यात आली.

एकूणच आज शहरात विठ्ठल भक्तिमय असे वातावरण निर्माण झाले होते. महिला मंडळच्या अनेक सदस्य महिला पारंपरिक पेहराव, काठपदार साडी या मध्ये दिंडीत सहभागी झाल्या होत्या सोबत विठल नामाचा गजर टाळ मऱ्दुंग चा निनाद या मुळे सर्वत्र प्रसन्नता निर्माण झाली होती.

या दिंडीत अग्रभागी विठ्ठलाची मूर्ती व महिलांच्या हातात भगवे पताका ,आणि टाळ मृदंगाच्या निनादात विठ्ठला विठ्ठला..हरी ओम विठ्ठला चां जयघोष करीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ही दिंडी मोंढा,राणी लक्ष्मीबाई टावर, नेहरू चौक मार्ग संत जगमित्रनागा मंदिरात आली.