कृष्णगुंज गुरुकुलतर्फे २१ आणि २२ जुलै रोजी संगीत मेडिटेशन मोफत कार्यशाळा

🔺संगीत🔺मेडिटेशन

छत्रपती संभाजीनगर : कृष्णगूंज गुरुकुल आणि ट्रान्स डेल्टा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि 21 आणि 22 जुलै रोजी सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत संगीत मेडिटेशन कार्यशाळेचे (Meditation Session with FluteNiranjan) आयोजन करण्यात आले आहे. मृदगंध कला दालन ,319, बेकर्स लॉन्ज, वसंतराव नाईक चौक, एन 3, सिडको , छत्रपती संभाजीनगर येथे ही दोन दिवसीय मोफत कार्यशाळा होणार आहे.

मेडिटेशन विथ फ्लूट ही एक म्यूजिक थेरेपी असून शहरातील प्रसिद्ध बासरी वादक निरंजन भालेराव हे मागील 5 वर्षा पासून यावर संशोधन करत आहेत. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने ही थेरेपी केली जात असून यामाध्यमातून अनेक अजारांवर नियंत्रण मिळवता येते. सध्याच्या धकाधकी च्या जीवनात येणारा मानसिक ताण तनाव दूर करणे , माइग्रेन , रक्तदाब, शुगर तसेच कॉर्पोरेट सेक्टर मधील डिप्रेशन , स्पर्धा परीक्षासाठी एकाग्रता, लहान मुलांसाठी थेरपी तसेच विशेष गर्भसंस्कार अश्या अनेक गोष्टीवर निरंजन भालेराव बासरीच्या माध्यमातून संशोधनात्मक काम करत आहे. लाइव बासरीवादनाच्या माध्यमातून ही कार्यशाळा आयोजित होणार असून, दहा वर्षा पुढील महिला व पुरुष या मोफत कार्यशाळेत सहभाग घेऊ शकतील, अशी माहिती कृष्णगुंज गुरुकुलच्या वतीने देण्यात आली आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/FluteNiranjan या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि कार्यशाळेत सहभागी होत असतांना आपल्यासोबत योगा मॅट आणि पाण्याची बॉटल सोबत आणावी.

निरंजन भालेराव, बासरीवादक
मागील अठरा वर्षापासून मी बासरी वादनाची सेवा करत आहे मागील पाच वर्षापासून मेडिटेशन वर काम करत आहे. लाइव बासरी वादनातुन एक मेडिटेशन थेरेपी तयार केली. यात माला अनेक डॉक्टरांची मदत झाली. आध्यात्मिक सोबत वैज्ञानिकदृष्टया याचा पाया पक्का झाला. त्यामुळे अनेक जणांवर याचा प्रयोग करता आला. काही ठराविक फ्रीक्वेंसीचा वापर करून ही म्यूजिक थेरेपी देण्यात येते. अनेक हॉस्पिटल मधील आयसीयू, ओपिडी, कॉर्पोरेट ऑफिस, तसेच शाळा-कॉलेजमध्ये या म्यूजिक थेरेपीचा वापर होत आहे.

🔺अधिक महितीसाठी संपर्क 9420922156, 8208985256