सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त वारी संपन्न

🔺आषाढी एकादशी 🔺 वृक्ष दिंडी

बीड- परळी वैजनाथ- आषाढी एकादशी निमित्त सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी येथे शाळेच्या वतीने वारीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वारकरी परंपरेनुसार पालखी,वृक्ष दिंडी आणि ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती.सामाजिक वनीकरनाच्या माध्यमातून शाळेत व गावात १०० वृक्षांचे वाटप व लागवड करण्यात आले.

शाळेच्या विध्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेत दिंडीमध्ये लेझीम, वारकरी पाऊले तसेच विठुरायाच्या गीतांवर नृत्य सादर करत विद्यार्थ्यांची गावातून दिंडी काढण्यात आली. यामध्ये मुलांनी वृक्ष संवर्धनासाठी विविध घोषणा दिल्या पालखी सोहळ्याचे गावात भरभरून स्वागत केले व उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सगळा परिसरात आनंद उल्हासाने ओसंडून वाहत होता.हा सोहळा सोमनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम एस शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.तसेच शाळेचे कलाशिक्षक श्री दीपक आंधळे सर यांनी मुलांचा सराव घेऊन दिंडी यशस्वी पार पाडली.यासाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.