🔺आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार.
परळी वैजनाथ– शहरातील भाजपा चे जुन्या पिढीतील माजी नगरसेवक तथा दीनदयाळ बँकेचे संचालक राजाभाऊ रामभाऊ दहिवाळ यांचे वयाच्या 67 वर्षी बुधवार दि. 17 जुलै रोजी रात्री 11 वाजता हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माणिक नगर येथून अंत्ययात्रा निघणार आहे.
माणिक दहिवाळ दोस्ती टी हाऊस चे मालक यांचे कनिष्ठ ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले एक मुलगी भाऊ, भावजया असा मोठा परिवारआहे.
माजी नगरसेवक राजाभाऊ दहिवाळ हे भाजपाचे एक सच्चे कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने एक समंजस आणि तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालणार कार्यकर्ता पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

