🔶 माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी ऐका भगिनींस प्रातीनिधिक फॉर्म दिला भरून
परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क– कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब व माजी मंत्री आ. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 15 जुलै ते 26 जुलै दरम्यान परळीचे माजी नगराध्यक्ष व गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने परळी शहरात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे” प्रभागनिहाय नोंदणी कॅम्प सुरु झाले आहेत.असून या शिबिरातून जास्तीत जास्त बहीणीनी नोंदणी करावी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रत्येक बहिणीला दरमहा 1500/- रुपये सन्मान निधी सुरु करुन द्यावा अशी विनंती. धर्माधिकारी यांनी केली.
माणिक नगर भागात शिबिराला भेट देवून एका बहिणीचा प्रातिनिधीक अर्ज भरून दिला यावेळी युवती शहराध्यक्षा वर्षाताई दहिफळे, युवक नेते अमित केंद्रे,अभिजीत धाकपाडे,बळीराम नागरगोजे,ज्ञानेश्वर होळंबे,अनिल कदम,प्रदीप जाधवर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.