आ. राजेश  विटेकर यांचा नागरी सत्कार सोहळा

🔶 अनेक वर्षानंतर सोनपेठ तालुक्यास मिळाला आपला माणुस🔺भव्य मिरवणूक, मान्यवरांची उपस्थिती

परभणी/सोनपेठ -सोनपेठ तालुक्याचे भुमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आ. राजेश विटेकर यांचा सोनपेठ शहरातील शिवाजी छत्रपती महाराज संस्कृतीक सभागृहात आज भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

परभणी जिल्ह्यातील युवा नेतृत्व नवनिर्वाचित आ. राजेश विटेकर यांचे आज सोनपेठ शहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागत सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आ. राजेश विटेकर यांचे सकाळी ११. वा. माजलगाव येथे आगमन होणार आहे. ढालेगाव, पाथरी, मानवत मार्गे पोखर्णी नृसिंह दर्शन घेऊन ते शिर्शी मार्गे दुपारी ४.०० वा. सोनपेठ येथे आगमन होईल.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा येथुन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक सभागृहात नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, आजी माजी पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

आ. राजेश विटेकर यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला तरूण आमदार लाभला आहे. सोनपेठ तालुक्यातील विकासात्मक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल. सोनपेठ नगरीच्या भूमिपुत्राचा सत्कार सोहळ आज शुक्रवारी होत आहे. या सोहळ्यास तालुक्यांतील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. दशरथ सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष तथा सभापती, सोनपेठ.यांनी केले आहे.